शिवशाही न्युज नेटवर्क
पंढरपुर
श्री संत केजाजी प्रसारक मंडळ, घोराड यांच्या वतीने श्री संत केजाजी महाराज पायदळ वारीला पंढरपुर येथील मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदान दिले, तर मागील तीन वर्षांपासुन या श्री क्षेत्र घोराड ते पंढरपुर पायी वारीत सहभागी होत असलेले सुनील ढगे (हिंगणघाट), विलास देवताळे (नागपुर) आणि राजेश झाडे (रेहकी) यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी पंखे व लाईट भेट देऊन सेवाभावाचे उदाहरण घालुन दिले आहे.
पंढरपुर येथे शेगांव दुमाला रोडवर श्री संत केजाजी महाराज मठावरील मुक्कामस्थळी टिनपत्र्याचे शेड उभारण्यात आले असले तरी उष्णतेमुळे वारकऱ्यांना मोठा त्रास होत होता. ही बाब लक्षात घेऊन या तिघा भाविकांनी चार सिलींग पंखे, लाईट व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य भेट देत वारकऱ्यांच्या सुविधेत मोलाची भर घातली.
या साहित्यामुळे मुक्कामस्थळी वारकऱ्यांना अधिक आरामदायी वातावरण मिळणार असुन, यावेळी मंडळाचे सदस्य पियुष तेलरांधे, बंटी महाजन, आशिष डोंगरे, चैताली गोमासे, मंगेश गोमासे,निता महाजन, प्रेम तपासे, धनश्री तपासे,सपना तेलरांधे,गजानन बालपांडे, चेतना बालपांडे, नितीन मांढरे, शामराव महाकाळकर यांनी अन्नदान साठी विशेष सहकार्य केले.यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे श्री संत केजाजी प्रसारक मंडळ तसेच वारकरी बांधवांकडून कौतुक करण्यात येत आहे. “वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा” या भावनेतुन करण्यात आलेल्या या कार्याचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे.


