राजेश वरटकर
मुख्य संपादक
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सेलु शहरात डास, विषारी किटक तसेच सापांचा प्रादुर्भाव वाढल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाला तातडीने मच्छरनाशक व कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी केली.
भाजयुमोचे जिल्हा सचिव संजय मोतीलाल जायसवाल यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी, नगरपंचायत अध्यक्ष सेलु यांना निवेदन देण्यात आले. शहरातील विविध भागांत साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याने तातडीने फवारणी मोहीम राबविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी ओमदेव सावरकर, नरेश पाठक, गोलू कामिंनकर, सागर करनाके, विनोद बेदरकर, अनिल घोडखांडे, धीरज पवणारकर, शिवा डुकरे, अमोल बुधवावरे आणि बालु साटोने उपस्थित होते.
निवेदनात वेळेत उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या हितासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नगरपंचायतीने तातडीने संपुर्ण शहरात फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच मेडिकल चौकातील मुत्रीघराची नियमित साफसफाई तसेच वाडीघरे यांच्या घराजवळील नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी याबाबत चर्चा केली, निवेदनाची दखल घेऊन लवकर कारवाई करावी अशी मागणी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

