राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु येथील ज्येष्ठ नागरिक बापुरावजी रोशनखेडे यांचे नातु तथा आर्किटेक्चर विद्यार्थी Ar. उदय गिरीश रोशनखेडे यांनी वास्तुकला शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी पुणे येथील काशीबाई नवले वास्तुकला महाविद्यालयातुन बी. आर्क. (B.Arch.) अंतिम वर्षाच्या परीक्षेत 9.7 एसजीपीए (95 टक्के) गुण मिळवत प्रथम श्रेणीसह विशेष प्रावीण्य (First Class with Distinction) प्राप्त केले.
याशिवाय, अंतिम वर्षासाठी त्यांनी सादर केलेल्या नागपुर येथील कचरा यार्डाच्या पुनर्विकासावर आधारित प्रकल्पाची महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट प्रेझेंटेशन (Best Presentation) म्हणुन निवड करण्यात आली. त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत त्यांना 13 ऑगस्ट 2026 रोजी हैदराबाद येथील ICFAI School of Architecture मध्ये हा प्रकल्प सादर करण्याची मानाची संधी मिळाली आहे.
उदय रोशनखेडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे कौतुक होत असुन, त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

