२१ कलमी मागण्यांसाठी लढा तीव्र
कामगार, शेतकरी, बेरोजगार आणि ग्रामस्थांच्या प्रश्नांवर प्रशासनाला घेराव; तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
हिंगणी येथील विविध प्रलंबित प्रश्न सोडवावेत, कामगारांना न्याय मिळावा, शेतकरी, बेरोजगार आणि ग्रामस्थांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, यासाठी राष्ट्रीय मजदुर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हिंगणी येथील बाजार चौकात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आंदोलनस्थळी २१ कलमी मागण्यांचे फलक लावुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असुन, मागण्या त्वरित पुर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
आंदोलकांनी एफडीसीएम कर्मचाऱ्यांना काम उपलब्ध करून देणे, २००१ पासुन थकीत वेतनाचा प्रश्न निकाली काढणे, ६० वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागु करणे, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे, आयपीएस (ईपका )कंपनीतील प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना सुरक्षित रोजगार देणे, शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी, हमीभाव, पेन्शन योजना तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
याशिवाय हिंगणी येथे पोलीस स्टेशनच्या मंजुर इमारतीचे तातडीने बांधकाम सुरू करावे, ग्रामीण रुग्णालय मंजुर करावे, तसेच विविध शासकीय योजनांबाबत माहिती जाहीर करण्याचीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
आंदोलनस्थळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून उपोषणाला सुरुवात करण्यात आली. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.गुरुवारी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन पाठींबा जाहीर केला.
आंदोलनाचे नेतृत्व वर्धा जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष भाष्करराव मुडे करीत असुन, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
ईपका कंपनी चे एम.डी.विनायक फडणीस हे कंपनी कडुन कामगारांना मिळणाऱ्या पगारात हेराफेरी करून आर्थिक लुट करीत आहे, तसेच स्थानिक कामगारांना कामावर न घेता बाहेरील कामगारांना पैसे घेऊन रोजगार देत आहे.त्यामुळे ईपका कंपनी चे फडणीस यांच्या वर गुन्हा दाखल करून कामगारांना न्याय मिळवुन देण्यासाठी साहसिक जनशक्ती संघटना पुर्ण ताकदीने जोर लावणार आहे.तसेच प्रशासनाने दखल घेतली नाही तर उपोषण आणखी तीव्र करु.
रविन्द्र कोटंबकार
संस्थापक अध्यक्ष
साहसिक जनशक्ती संघटना


