प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यु
एक महिण्या अगोदर गमावला दोन तरुणांनी जिव
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
सेलु तालुक्यातील सालई कला येथील अशोक कुमरे यांचा रायपुर जंगली येथील रिधोरा धरणासमोरील धबधब्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना शनिवारी ५ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे सालई कला गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक कुमरे हे रायपुर जंगली येथील रिधोरा धरण पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्यात उतरल्यानंतर त्यांचा तोल जाऊन ते खोल पाण्यात बुडाले. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवुन त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अधिकृत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया संबंधित पोलिसांकडुन सुरू असल्याची माहिती मिळाली. एक महिण्या अगोदर ३० जुन ला वर्धा येथील दोन तरुणांनी याच रिधोरा धरणात जिव गमावला होता मात्र प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देउन
प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे होते.मात्र तसे न केल्याने आणखी एक जीव गेला आहे.यामुळे रिधोरा धरण हे पर्यटन स्थळ आहे की मृत्यु चा सापळा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

