अध्यक्षपदी प्रशांत कलोडे तर सचिवपदी बबलु खान
विशेष प्रतिनिधी
सेलु: तालुक्यातील सिंदी रेल्वे येथे व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची कार्यकारिणी राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात आनंद छाजेड यांच्या निवासस्थानी पार पडली.
अध्यक्षपदी प्रशांत कलोडे तर सचिवपदी बबलु खान यांची एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी संघटनेत रचनात्मक बदल केल्यानुसार राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.
कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रशांत कलोडे, सचिवपदी बबलु खान तर कार्यकारिणी सदस्य म्हणुन ओमप्रकाश राठी, आनंद छाजेड, मोहन सुरकार, अमोल सोनटक्के, नरेंद्र सुरकार, प्रशांत बोरीकर, गुल्लु भन्साली, आफताब कुरेशी आदींची निवड करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
