शिवशाही न्युज नेटवर्क
सिंदी (रेल्वे) : सिंदी (रेल्वे) येथे गेल्या ४७ वर्षांपासुन अखंड सुरू असलेल्या श्री हनुमान सप्ताहाचा आज (दि. ५ ऑगस्ट) भक्तिमय वातावरणात समारोप होत आहे.
सप्ताहादरम्यान श्री हनुमानजींचे पुजन, भजन-कीर्तन, हरिनाम संकीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परिसरातील व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवत श्री हनुमानजींचे दर्शन घेतले.
आज समारोपानिमित्त सकाळी विशेष महापुजा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गेल्या ४७ वर्षांपासुन सुरू असलेली ही धार्मिक परंपरा ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागातून आजही अखंडपणे सुरू असून, सिंदी (रेल्वे)च्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे हे महत्त्वाचे प्रतीक मानले जाते.

