‘जनतेच्या आरोग्याशी खेळ’ म्हणत IMA आक्रमक; राज्यभर दवाखाने बंद,
सरकारचा निर्णय मागे घेण्याची मागणी
राजेश वरटकर
मुख्य संपादक
राज्य सरकारने BHMS पदवीधरांना एक वर्षाचा CCMP अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभुमीवर राज्यभर तीव्र वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने आक्रमक भुमिका घेत राज्यव्यापी आंदोलन छेडले असुन, अनेक शहरांमध्ये डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवुन निषेध नोंदविला.
IMA च्या मते, हा निर्णय रुग्णांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणारा असुन अॅलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन वेगळ्या वैद्यकीय पद्धतींची सरमिसळ करणे धोकादायक ठरू शकते. “मिक्सोपॅथी”ला कोणत्याही परिस्थितीत मान्यता देता येणार नाही, अशी स्पष्ट भुमिका संघटनेने घेतली आहे.
सरकारने ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता हे कारण पुढे केले असले तरी, सध्या MBBS डॉक्टर उपलब्ध असुन त्यांना नोकरीत सामावुन घेण्यात यावे व हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी IMA ने केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.*
आंदोलनातील प्रमुख मुद्दे
BHMS ला अॅलोपॅथी प्रॅक्टिसच्या निर्णयाला IMA चा तीव्र विरोध
राज्यभर अनेक ठिकाणी दवाखाने बंद ठेवुन निषेध
“मिक्सोपॅथी नको” अशी डॉक्टरांची ठाम भुमिका
त्वरीत निर्णय न घेतल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल.

