शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
आज रोजी पोलीस स्टॉप पोलीस स्टेशनला हजर असताना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की एक इसम मोटर सायकलने केळझर कडुन मोटर सायकलवर चार प्लास्टिक डबकीमध्ये गावठी मोहा दारुने भरुन सेलुकडे घेऊन येत आहे. अशा माहितीप्रमाणे दंढारे टी पॉइंट जवळ नाकेबंदी केली असता आरोपी अविनाश बंडुजी मडावी वय 21 वर्ष रा. वार्ड नं.04 सेलू हा मोटरसायकल ने येताना दिसला तेव्हा तपासणी केली असता
त्याच्या ताब्यातुन चार प्लास्टिक डबकी मध्ये 80 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 200/- रुपये प्रमाणे 16000/- रु.
चार प्लास्टिक डबकी किंमत 400/- रु एक होंडा कंपनीची कळ्या रंगाची शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच 32 ए. डब्ल्यु 7809 किंमत 60,000/- रुपये
असा एकुण 66,400 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला व आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सेलु येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू, पोलीस आमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाणे, लोकेश लोहोकरे यांनी केली आहे.
