शिवशाही न्युज नेटवर्क
भारतीय जनता युवा मोर्चा, सेलु तालुका यांच्या वतीने बुधवार दि.१२ला सेलु बसस्थानक येथे शाळा सुटण्याच्या वेळेस रोड रोमिओंचे वाढते प्रमाण लक्षात घेता, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बसस्थानक परिसरात होमगार्ड किंवा पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन ठाणेदार पंकज वाघोडे यांना देण्यात आले.
शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थिनी बसस्थानकावर येतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी संजय जयस्वाल सचिव, भाजपा वर्धा जिल्हा, प्रफुल खोडे अध्यक्ष, सेलु, मनोज केळझरकर महामंत्री, सेलु तालुका, विनोद बेदरकर सचिव, भाजपा सेलु शहर, शिवा डुकरे सचिव, भाजयुमो वर्धा जिल्हा, ज्ञानेश्वरी मसराम सचिव, भाजयुमो सेलु तालुका, आशिष मसराम सोशल मीडिया प्रमुख, धीरज पवनारकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुलींची सुरक्षा ही आपली सामुहिक जबाबदारी आहे. सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे
संजय जयस्वाल
सचिव भाजपा वर्धा

