खासदार अमर काळेंचा केंद्र सरकारला थेट सवाल; ३१ मार्च २०१५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TETमधुन दिलासा देण्याची मागणी
शिवशाही न्युज नेटवर्क
दिल्ली
वाढदिवसाच्या दिवशी वैयक्तिक सोहळे आणि शुभेच्छांमध्ये रमण्याऐवजी वर्धा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमर शरदराव काळे यांनी शिक्षकांच्या सेवासुरक्षेचा अत्यंत संवेदनशील प्रश्न केंद्र सरकारच्या दरबारात मांडत जनहिताला प्राधान्य दिले. १३ ऑगस्ट रोजी दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेत खासदार काळे यांनी ३१ मार्च २०१५ पूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात TET उत्तीर्ण होण्याच्या अनिवार्यतेतुन सुट अथवा दिलासा देण्याची मागणी केली.
केंद्र सरकारने ऑगस्ट २०१७ मध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम २३(२) मध्ये सुधारणा केली. या बदलामुळे ३१ मार्च २०१५ रोजी किंवा त्यापुर्वी सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांनाही TET उत्तीर्ण होण्याची अट लागु झाली. त्यामुळे जुन्या नियमांनुसार नियुक्त होऊन अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या अनुभवी शिक्षकांच्या सेवासुरक्षा, पदोन्नती आणि भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे खासदार काळे यांनी केंद्राच्या निदर्शनास आणुन दिले.
अनुभवी शिक्षकांच्या हिताचे रक्षण करा!
खासदार अमर काळे यांनी केंद्र सरकारकडे या प्रकरणाचा सहानुभुतीपुर्वक विचार करण्याची मागणी केली आहे. ३१ मार्च २०१५ पूर्वी नियुक्त होऊन त्यावेळी सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना TETच्या अनिवार्यतेतुन सुट देण्यासाठी आवश्यक निर्णय घेऊन त्यांच्या हिताचे रक्षण करणारे स्पष्ट दिशा-निर्देश जारी करावेत, अशी भुमिका त्यांनी मांडली.
वाढदिवशी जनहिताचा ध्यास
वाढदिवशी शुभेच्छांचा स्वीकार करण्याऐवजी दिल्लीत राहुन राज्यातील शिक्षकांच्या सेवासुरक्षेशी निगडित प्रश्नासाठी पाठपुरावा केल्याने खासदार अमर काळे यांच्या भुमिकेचे शिक्षण क्षेत्रातुन स्वागत होत आहे. आता केंद्र सरकार या मागणीवर कोणता सकारात्मक निर्णय घेते, याकडे राज्यातील हजारो शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
वाढदिवसाच्या दिवशी शिक्षकांच्या प्रश्नासाठी दिल्लीत आवाज उठावणाऱ्या खासदार अमर काळे यांना हार्दिक शुभेच्छा!

