निधी वितरणाची प्रक्रिया सुरू; पात्र महिलांच्या खात्यात लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता
राजेश वरटकर
मुख्य संपादक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. जुलै २०२६ च्या हप्त्यासाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असुन, निधी वितरणाची प्रक्रिया पुढे सरकली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाकडुन मोठ्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. हा निधी महिला व बाल विकास विभागामार्फत पात्र लाभार्थी महिलांना वितरित केला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासुन हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दरम्यान, लाभार्थी महिलांची पात्रता निश्चित करण्यासाठी ई-केवायसी, आधार-बँक खाते जोडणी तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पात्रता निकष पुर्ण न करणारे किंवा आवश्यक कागदपत्रांची पुर्तता न केलेले अर्ज अपात्र ठरविले जाऊ शकतात.
जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम
जुलै महिन्याचा हप्ता १५ ऑगस्ट नंतर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष हप्ता कोणत्या दिवशी जमा होणार याबाबत शासनाकडुन अंतिम अधिकृत तारीख जाहीर होणे बाकी आहे.
त्यामुळे लाभार्थी महिलांचे लक्ष आता शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे. निधी वितरणाची प्रक्रिया पुर्ण होताच पात्र महिलांच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

