शिवशाही न्युज नेटवर्क
घोराड
गोपाल दुग्ध उत्पादक सोसायटी, घोराड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहात झेंडावंदन करण्यात आले. माजी सरपंच वसंतराव तेलरांधे यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. यापूर्वी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी स्वर्गीय गणेश खोपडे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. दरवर्षी स्वातंत्र्य दिन तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाचे आयोजन करण्यात गणेश खोपडे यांचा पुढाकार असायचा. मात्र, २२ जुन रोजी त्यांच्या आकस्मिक निधनानंतरही ही परंपरा खंडित होऊ नये म्हणुन त्यांच्या अर्धांगिनी पल्लवी गणेश खोपडे व प्रभाकर पाटील,अनिकेत झोरे यांनी ही परंपरा यंदाही अखंडितपणे पुढे नेली.
कार्यक्रमाला प्रभाकर पाटील, माजी पोलीस पाटील नरेंद्र फटींग, माजी सरपंच गोपाळा माहुरे, माजी उपसरपंच दीपक झोरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश नक्षीणे, दिलीप पोहाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधाकर खराबे, लक्ष्मण वरटकर, पोलीस पाटील निलेश गुजरकर, प्रतिष्ठित नागरिक बबन येळणे, शालीक माहुरे, प्रविण खोपडे, कु. अधीरा गणेश खोपडे, अमोल झोरे, पत्रकार राजेश वरटकर, माजी सरपंच ताराबाई तेलरांधे, धनराज समर्थ,बंडु मुंगभाते , सुहानी लाखे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
गणेश खोपडे यांच्या स्मृती जपत सुरू ठेवण्यात आलेल्या या परंपरेमुळे कार्यक्रमाला यंदा विशेष भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

