राजेश वरटकर
मुख्य संपादक,
शिवशाही न्युज
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर आज १५ ऑगस्ट रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंग पवार यांनी सेलु येथील ग्रामीण रुग्णालयाला आकस्मिक भेट देत रुग्णालयाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्यसेवा, उपलब्ध सुविधा तसेच रुग्णालयातील स्वच्छतेचा आढावा घेतला. रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याला विशेष प्राधान्य देत नियमित साफसफाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
“सेलु ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाभरात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील,” असा विश्वास डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला. रुग्णालयाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी तसेच रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापुढेही नियमित भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या या आकस्मिक भेटीवेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतिक वाटखेडकर, मुख्य परिचारिका रूषाली शिंगारे,सफाई कर्मचारी माहुरे यांची उपस्थिती होती.
ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयाच्या सेवा-सुविधांमध्ये सुधारणा होऊन सेलु ग्रामीण रुग्णालयाचा जिल्ह्यात नावलौकिक वाढावा, अशी अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त होत आहे.
