राजेश वरटकर
वर्धा येथील त्रिमुर्ती नगर (उमरीमेघे) परिसरातील हर्बल लाईफ वेलनेस सेंटरमध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष आरोग्य व देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमात वरिष्ठ आरोग्य सल्लागार ज्योती ढगे तसेच आरोग्य सल्लागार वैशाली भोयर यांच्या उपस्थितीत महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माधुरी थोरात, मंगला निखाडे, जया काकडे, घुमडे मॅडम, तुमडाम मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांची विशेष मेजवानी देण्यात आली. देशभक्तीच्या गीतांचा जोशपुर्ण ताल आणि उत्साहाच्या वातावरणात महिलांनी गीतांच्या तालावर नृत्य करत व्यायामाचा आनंद घेतला. त्यामुळे आरोग्य, व्यायाम आणि देशभक्तीचा अनोखा संगम या कार्यक्रमातुन अनुभवायला मिळाला.
यावेळी ज्योती ढगे यांनी महिलांना नियमित व्यायाम, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विशेष म्हणजे, ज्योती ढगे यांच्या पुढाकारातुन हर्बल लाईफ वेलनेस सेंटरमध्ये दररोज सकाळी ५ वाजता ऑनलाइन, तर सायंकाळी ६.३० वाजता ऑफलाइन निःशुल्क आरोग्य मार्गदर्शन व व्यायामाचे आयोजन केले जाते.
देशभक्तीच्या गीतांवर व्यायाम करत महिलांनी स्वातंत्र्यदिनाचा आनंद द्विगुणित केला. आरोग्यासोबतच देशभक्तीची भावना जागविणारा हा उपक्रम परिसरात विशेष आकर्षण ठरला.

