वहिनी–दिराच्या प्रेमसंबंधात पतीचा काटा!
पत्नीची पोलीसांत मिसिंग तक्रार
पतीची गळा आवळुन हत्या; मृतदेह शेतात फेकला, पत्नीच निघाली कटाची सुत्रधार; चौघे पोलिसांच्या ताब्यात
वर्धा | शिवशाही न्यूज
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापुर (बाई) येथे प्रेमसंबंधातुन पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचे प्रेमसंबंध असल्याने पती अडसर ठरत होता. अखेर पत्नीने प्रियकर आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने पतीची गळा आवळुन हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह गावालगतच्या शेतात फेकुन देण्यात आला. या प्रकरणाचा उलगडा होताच परिसरात खळबळ उडाली आहे.
संतोष पांडुरंग कैकाडे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, संतोष कैकाडे यांच्या पत्नीचे शुभम कैकाडे(३०) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात संतोष अडथळा ठरत असल्याने त्यांना संपविण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
मध्यरात्री घरातच रचला हत्येचा कट!
१६ ऑगस्टच्या रात्री संतोष घरी परतल्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पत्नी सपना हिने शुभम कैकाडे आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने संतोष यांचा गळा आवळुन हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह गावालगतच्या शेतात नेऊन फेकण्यात आला.
पत्नीची पोलीसांत पती मिसिंग असल्याची तक्रार
पतीचा काटा काढल्यावर संशय येऊ नये म्हणुन पत्नी सपनानेच वडणेर पोलीस स्टेशन मध्ये मिसींग ची तक्रार दाखल केली मात्र पोलीसांना शंका आल्याने दुसऱ्या बाजुने तपास केला असता सपना चे दीक्षा सोबत प्रेम संबंध असल्याचे कळले व त्या अनुषंगाने तपास केला असता गुन्हा उघडकीस आला.
चौघे पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी वडनेर पोलिसांनी हत्या प्रकरणात सपना कैकाडे,३६ शुभम कैकाडे,३० सचिन बसुणे ३०आणि प्रशांत करपे ३६ या चौघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. हत्येमागील नेमका कट, प्रत्येकाची भुमिका आणि पुरावे याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
प्रेमसंबंधातुन जन्माला आलेल्या या हत्याकांडाने शेकापूर परिसर हादरला असून, नात्यांवरील विश्वासालाच हादरा देणारी ही घटना ठरली आहे.
