राजेश वरटकर
मुख्य संपादक
शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असून ड्रोनच्या माध्यमातुन पिकांवर फवारणी करण्याची पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कमी वेळेत मोठ्या क्षेत्रावर फवारणी करणे शक्य होत असून शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळही वाचत आहे.
पारंपरिक पद्धतीने फवारणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आधुनिक कृषी ड्रोनमुळे फवारणी अधिक सुलभ आणि जलद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तंत्रज्ञानाच्या पंखांवर आता शेतीची वाटचाल सुरू झाली आहे.

