विशेष प्रतिनिधी
वर्धा
महाराष्ट्र चॉकबॉल असोसिएशन व नागपुर जिल्हा चॉकबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वी राज्यस्तरीय ज्युनियर चॉकबॉल स्पर्धा दिनांक २८ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान आमदार निवास (MLA Hostel), नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या ज्युनियर संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्व प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत प्रथम क्रमांक पटकावला व वर्धा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
विजेत्या संघात कर्णधार तीर्थक वरठी, उपकर्णधार तोहीर शेख, अनमोल नगराळे, यश राऊत, शिवतेज चिडाम, सुजल पोहीनकर, विनायक गिरीपुंजे, हर्षल ठाकूर, ओम अमझरे, प्रेम राठोड, चंदन वरठी व निजाम शेख या खेळाडुंचा समावेश होता.
राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडुंचा पुरस्कार यश राऊत यास प्राप्त झाला.
या स्पर्धेमधुन महाराष्ट्र संघ घोषित झाला आणि महाराष्ट्र संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे, राष्ट्रीय स्पर्धे करिता वर्धा संघातील तीन खेळाडू तोहीर शेख, हर्षल ठाकूर व यश राऊत यांची निवड झाली, राष्ट्रीय स्पर्धा गुवाहिटी आसाम येते होणार आहे.
या संघाला प्रशिक्षक म्हणून करण चौहान व राकेश बोन्द्रे यांनी तर व्यवस्थापक म्हणून प्रणव वाढवे व बादल ढोबळे यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल वर्धा चॉकबॉल असोसिएशनचे अध्यक्ष समीर देशमुख, सचिव अनंत भाकरे, सदस्य अश्विन साबळे यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तसेच वर्धा चॉकबॉलचे शुभचिंतक गोलु कामीणकर व आशिष मसराम यांनीही विजेत्या संघाचे कौतुक केले.
यशानंतर खेळाडुंनी आपल्या यशाचे श्रेय आपले पालक, प्रशिक्षक व संपुर्ण चॉकबॉल परिवाराला दिले.

