उमरी मेघेतील आधार संघ कार्यालयात रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
उमरी मेघे रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला सामाजिक बांधिलकी आणि आरोग्याचा संदेश देत त्रिमूर्ती नगर येथील **आधार संघ कार्यालयात योगा वर्कआउट (वेलनेस सेंटर)**च्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. वेलनेस सेंटर तसेच आधार संघातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात उपसरपंच सचिन खोसे व आरोग्य सल्लागार ज्योती ढगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला हार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सरपंच सचिन कोळसे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
वेलनेस सेंटरच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागार ज्योती ढगे व आरोग्य सल्लागार वैशाली भोयर यांच्या आयोजनातुन हा उपक्रम घेण्यात आला. ज्योती ढगे यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना नियमित योग, व्यायाम आणि संतुलित जीवनशैलीचे महत्त्व पटवुन दिले.
यावेळी सचिन खोसे यांनी महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत, “महिलांचे ऋणी असुन भविष्यात शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणार,” असा विश्वास दिला. जया काकडे व मयुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वैशाली भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजुषा तुमडाम, मंगला निखाडे, प्रिया देशमुख, रत्ना भेंडे, नेहा चिनेवार, माधुरी भोगे, अनिता कुमरे, शिखा, धानोरकर ताई, श्रावणी व रेणुका यांनी सहकार्य केले. करुणा शंभरकर यांनी आभार मानले.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्नेह, सामाजिक बांधिलकी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष ठरला.

