‘पोळा सिटी’मध्ये उत्साह शिगेला; भव्य नंदींची मिरवणुक, महाकालाची झांकी अन् हॉरर थीम ठरणार आकर्षण
विशेष प्रतिनिधी
सिन्दी रेल्वे
विदर्भातील प्रसिद्ध ‘पोळा सिटी’ म्हणुन ओळख असलेल्या सिन्दी रेल्वे शहरात ऐतिहासिक नंदी पोळ्याचा उत्साह आज शिगेला पोहोचला आहे. पारंपरिकतेसोबतच आकर्षक सजावट आणि विविध झांक्यांमुळे यंदाचा नंदी पोळा विशेष ठरणार आहे.
शहरातील मोठमोठ्या नंदींची भव्य मिरवणूक आज काढण्यात येणार असुन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साहपुर्ण वातावरणात नंदी पोळा साजरा केला जाणार आहे. मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक झांक्या सहभागी होणार आहेत.
यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे उज्जैन येथील महाकालाची भव्य झांकी. यासोबतच सादर करण्यात येणारी हॉरर थीम नागरिकांचे लक्ष वेधुन घेणार आहे. त्यामुळे नंदी पोळ्याची मिरवणुक पाहण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
परंपरा, श्रद्धा आणि आधुनिक कल्पकतेचा अनोखा संगम असलेल्या सिन्दी रेल्वेच्या नंदी पोळ्याकडे संपुर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

