अनुज वरटकर
घोराड/प्रतिनिधी
घोराड : श्रीक्षेत्र घोराड येथील पारंपरिक बैलपोळ्याला यंदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सामाजिक किनार लाभली. सचिन पोहाणे यांच्या बैलजोडीवर शेतकऱ्यांच्या विविध समस्या व मागण्यांचे संदेश लिहुन शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
घोराड चे सुपुत्र व वर्धा येथील शिक्षक आशीष पोहाणे हे दरवर्षी आपल्या परिवारासह घोराडच्या बैलपोळ्यात सहभागी होतात. शेतकऱ्यांच्या समस्या समाज आणि शासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने ते दरवर्षी बैलजोडीवर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शासणाचे लक्ष वेधण्यात.
शेतमालाला योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च, शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यांसह वाढनारी महागाई अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी यंदाही बैलाच्या पाठीवर संदेश लिहिण्यात आले.
साखरेचे वाढलेले भाव, इथेनॉल चा डंका,आमजनतेला ठणका, तसेच शेतकऱ्यांच्या भाकरी चा सन्मान करा,जंक फुड चा बाजार बंद करा.असे निषेध करणारे संदेश लिहुन नागरिक तसेच सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
बैलपोळ्याच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचा हा अनोखा उपक्रम ठरला.
यामुळे दरवर्षी सचिन पोहाणे यांची बैलजोडी लक्षवेधी ठरते.



