१५० जार थंड पाण्याचे मोफत वाटप; पोळाप्रेमींची भागविली तहान
सिंदी रेल्वे : प्रतिनिधी
सिंदी रेल्वेच्या ऐतिहासिक तान्हा पोळा महोत्सवात लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या पोळाप्रेमी व नागरिकांसाठी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी, शाखा सिंदी रेल्वे यांच्या वतीने गर्दीच्या बसस्थानक चौकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
तान्हा पोळा महोत्सवासाठी शहरासह परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक व पोळाप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी उन्हाचा व उकाड्याचा त्रास लक्षात घेता बुलडाणा अर्बनच्या वतीने थंड पाण्याचे तब्बल १५० जार उपलब्ध करून देण्यात आले. स्टॉलवरून नागरिकांना मोफत पाणी वाटप करण्यात आल्याने पोळाप्रेमींसह नागरिकांची तहान भागविण्यास मोठी मदत झाली.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले. उत्सवाच्या गर्दीत नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने बुलडाणा अर्बनने केलेली ही सेवा विशेष ठरली.
या उपक्रमासाठी बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत संगवई, शाखा व्यवस्थापक वर्धा विजय राऊत, अनिरुद्ध जोशी, सिंदी शाखा व्यवस्थापक चंद्रशेखर मुंडे, स्नेहल घाटे, अतुल बेलखोडे, विलास जांबुतकर, प्रविण देवढे, राहुल इलरकर, सुनील वडांद्रे आदींनी परिश्रम घेतले.

