कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेल्या बसस्थानकाला गळती; पावसापासुन प्रवाशांचे संरक्षण कसे होणार?
विशेष प्रतिनिधी
सेलु
मागील वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करून बसस्थानक बांधण्यात आले मात्र सुरुवातीपासुनच हे बसस्थानक चर्चेचा केंद्रबिंदु होते, कोट्यावधी रुपये खर्च करून ही या बसस्थानकावर टिनपत्रे टाकण्यात आले यामुळे या कामात गैरप्रकार झाल्याची चर्चा असतानाच वादळी वारे आले व टिनपत्रे उडाली व पहिल्याच पावसात गळती लागली व शेड ला लावलेल्या पंखे पाण्यात भिजले याबाबत बातमी प्रकाशित होताच नवीन पंखे लावण्यात आले होते.तेव्हापासुनच हे बसस्थानक परिसरात चर्चेचा विषय ठरले होते, पहिल्या च पावसात छताला गळती लागली,या गंभीर बाबीकडे वृत्तपत्रांच्या माध्यमातुन लक्ष वेधण्यात आले, प्रशासनाने दखल घेत नविन छत बांधकाम करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या, या संपुर्ण प्रकरणाची माहिती मिळताच खासदार अमर काळे यांनी बसस्थानक परिसरात हजेरी लावली आरोप प्रत्यारोप झाले मात्र काही उपयोग झाला नाही.
अशातच
शनिवारी दि.१२ला रात्री ८वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलु बसस्थानकाच्या इमारतीला गळती लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. बसस्थानकाच्या आवारात पाणी साचल्याने प्रवाशांना छत्रीचा आधार घेत बसावे लागले.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीला पावसाळ्यातच गळती लागल्याने इतका मोठा खर्च करूनही प्रवाशांना छत्री घेऊन बसस्थानकात थांबावे लागत असेल, तर या बांधकामाचा फायदा काय? असा सवाल प्रवाशांकडुन उपस्थित केला जात आहे.
बसस्थानकातील गळतीची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना पावसापासुन दिलासा द्यावा, अशी मागणी होत असतांनाही लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष करावे याला म्हणावे तरी काय? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

