मोन्टी खांदारे यांच्या आकर्षक मूर्तींना विशेष मागणी; राजस्थानी लुकमधील गणपती ठरतोय आकर्षण
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर वर्धा शहरात गणेशमुर्ती खरेदीसाठी नागरिकांची लगबग वाढली आहे. विविध आकार, आकर्षक रंगसंगती आणि कलाकुसरीने सजलेल्या गणेशमुर्तींना भाविकांकडुन पसंती मिळत आहे.
मोन्टी खांदारे यांच्या मूर्तिशाळेत यंदा विविध आकर्षक रूपांतील गणेशमुर्ती तयार करण्यात आल्या असून, या मुर्ती पाहण्यासाठी तसेच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेषतः राजस्थानी लुक असलेली गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
पारंपरिक पोशाख, रंगीबेरंगी पगडी, आकर्षक दागिने आणि बारकाईने केलेली कलाकुसर यामुळे या मुर्तीला वेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे. गणेशभक्तांच्या आवडीनुसार विविध संकल्पना आणि आकारातील मुर्ती उपलब्ध करून देण्यात आल्याने यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुर्तिकारांकडुनही पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक मुर्ती साकारण्यावर भर दिला जात आहे. गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याने शहरातील मुर्तिशाळांमध्ये सध्या मोठी लगबग पाहायला मिळत आहे.


