मार्तंड देवतारे यांच्या घरच्या जेष्ठा गौरी (महालक्ष्मी)
देवतारे परिवाराकडुन भक्तिभावाने उत्सव साजरा
हिंदनगर वर्धा येथील कामडी परीवार ५०वर्षापासुन करीत आहे महालक्ष्मी स्थापना
सेलू : शहरातील मार्तंड सदाशिव देवतारे यांच्या परिवारात गेल्या ८५ वर्षांपासुन गणेशोत्सव व जेष्ठा गौरी (महालक्ष्मी)स्थापनेची
परंपरा जपली जात आहे. यंदाही देवतारे परिवाराने भक्तिभावाने गणरायाची स्थापना केली असुन, गणरायासोबत महालक्ष्मीच्या आकर्षक मुर्तींची स्थापना करण्यात आली आहे.
फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक पुजाविधी आणि गणरायासह महालक्ष्मीचे मनोहारी रूप भाविकांचे लक्ष वेधुन घेत आहे. अनेक वर्षांपासुन सुरू असलेली ही परंपरा देवतारे परिवाराकडुन आजही श्रद्धेने पुढे नेली जात आहे.
दरम्यान, हिंदनगर वर्धा येथील किशोर देवराव कामडी यांच्या परिवारातही गेल्या ५० वर्षांपासुन गणरायाची तसेच महालक्ष्मीची स्थापना करण्याची परंपरा सुरू आहे. दोनही परिवारांकडुन अनेक वर्षांपासुन जपल्या जाणाऱ्या या परंपरांमुळे गणपती व गौरी सणाला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची जोड मिळाली आहे.

किशोर कामडी हिंदनगर वर्धा यांच्या घरी स्थापन करण्यात आलेल्या महालक्ष्मी माता

