गोपालन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका
विशेष प्रतिनिधी
सिन्दी रेल्वे
सिंदी रेल्वे, ता. २० : सिंदी रेल्वे येथील गोपालक रमेश खैरे यांच्या मालकीच्या दोन गाईंचा अज्ञात कारणाने मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खैरे यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असुन, त्यांच्या गोपालन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
सिंदी रेल्वे येथील रमेश खैरे हे गोपालनाचा व्यवसाय करतात. गाईंच्या संगोपनातुन मिळणाऱ्या दुधाच्या उत्पन्नावर त्यांचा व्यवसाय अवलंबुन आहे. परिसरातील शेतशिवारांमध्ये असलेल्या चराईच्या जागेवर ते आपल्या गोधनाला चरण्यासाठी नेत असतात. मात्र, अचानक दोन गाईंचा मृत्यु झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.
गोपालन हा खैरे यांच्या उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा व्यवसाय असल्याने दोन गाईंच्या मृत्यु मुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे

