चार वर्षीय अंशाचा कारमध्ये अडकून मृत्यू की घातपात; मृतकाचे वडीलानी मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांत केली तक्रार
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे अवघ्या चार वर्षांच्या अंश सुरज केळझरकर या चिमुकल्याचा कारमध्ये अडकन मृत्यु झाल्याची घटना संपुर्ण महाराष्ट्रात गाजत असताना या घटनेला आता नवे वळण मिळाले आहे. कारमधे अडकून अंशच्या मृत्युबाबत संशय व्यक्त करत त्याचे वडील सुरज विठ्ठल केळझरकर यांनी आता पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.या तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ ते १२.३० वाजताच्या दरम्यान अंश हा घरासमोरील रोशन अनंता सलाम यांच्या अंगणात खेळत होता. खेळत असताना तो अचानक तो दिसेनासा झाल्याने घराच्यानी परिसरासह आजुबाजुला त्याचा शोध घेतला. एक दीड तास शोध घेऊनही अंश मिळुन आला नाही याच दरम्यान, दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास तो शेजारी उभ्या असलेल्या एका कारमध्ये सिटवर पडुन आढळून आला.तेव्हा उपस्थितांनी अंशला तत्काळ घाटंजी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी त्याला यवतमाळ येथे हलविण्याचे सांगितले.यात उपचारादरम्यान अंशचा दुर्दैवी मृत्यु झाला. या प्रकरणा दरम्यान, एवढ्या चार वर्ष लहान मुलाचा कारमध्ये नेमका प्रवेश कसा झाला? तो कारमध्ये किती वेळ होता आणि कारमध्ये तो नेमक्या कोणत्या परिस्थितीत अडकला, कार लॉक कसि झाली याबाबत गंभिर प्रश्न उपस्थित झाले आहेत. खेळता खेळता अंशनी एवढ्या जून्या कारचा अडगळीत (जाम) दरवाजा कसा उघडला आणि तो आत कसा गेला, याबाबत संशय असल्याचे तक्रारदाराने नमुद केले आहे. अंशाच्या मृत्युतील या संपुर्ण घटनेची परिस्थिती संशयास्पद वाटत असल्याने अंशच्या मृत्युची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, असे मृतांचे वडीलाने तक्रारीत म्हटले आहे. तसेच तपासादरम्यान कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंशच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीवरुन चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यु
की घातपात हे कोडे उद्भवले असून याचा निःपक्ष तपास करण्याचे आवाहन पोलिस विभागासमोर उभे ठाकले आहे.
चार वर्षीय चिमुकला अंगणात खेळता -खेळता कारमध्ये तो कसा पोहोचला, किती वेळ कारमध्ये होता आणि त्याचा मृत्यु नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याची उत्तरे आता पोलिस तपासातुनच समोर येणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे चिखलवर्ध्यासह घाटंजी तालुक्यातील परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.


