सेलु शहरात होत आहे हळहळ व्यक्त
सेलुतील साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर; शेतात गेल्या असता काळाने घातला घाला
शहर प्रतिनिधी
सेलु
सेलु शहरातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटसमोर राहणाऱ्या साटोने कुटुंबावर आज बुधवार दि.२३ ला दुर्दैवी प्रसंग ओढवला. शाळेत शिक्षण घेणाऱ्या दिव्या सचिन साटोने (वय १०वर्ष)स्कुल आफ ब्रिलीयंट वर्ग ४आणि उन्नती सचिन साटोने (वय5 वर्षे)गुड शेफर्ड इंग्लीश स्कुल KG 2 या दोन चिमुकल्या बहिणींचा शेतातील विहिरीत पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेने संपुर्ण सेलु परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही बहिणी बुधवारी दुपारी शाळेतुन घरी आल्यानंतर त्यांचे वडील सचिन चंफत साटोने यांच्यासोबत शेतात गेल्या होत्या. शेतात गेल्या असताना सोबत आणलेला चिप्स चार पुडा खाण्यात व्यस्त असतानाच अचानक कुत्रा धावत आला,कुत्रा चावण्याची भिती मनात आल्याने दोघी एकमेकींना बिलगल्या व येथेच घात झाला व तोल जाऊन विहीरीत पडल्या यावेळी वडील सचिन साटोने तेथेच हजर होते, लगेच त्यांनी विहीरीत उडी घेतली व वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र पोहता येत नसल्याने प्रयत्न असफल
मुली विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वडिलांनी बाजुच्या शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावीले मात्र तोपर्यंत वेळ झाला आणि काळाने आपला डाव साधला. नागरिकांच्या मदतीने त्यांना विहिरीतुन बाहेर काढुन ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही मुलींचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांकडुन पुढील कारवाई
घटनेची माहिती मिळताच सेलु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची नोंद घेण्यात आली असुन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या घटनेचा नेमका तपशील पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
दिव्या आणि उन्नती यांच्या दुर्दैवी मृत्युने साटोने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असुन परिसरात शोककळा पसरली आहे.शवविच्छेदना नंतर दोन्ही मृतदेह घरी आणले तेव्हा घरासमोर बघ्यांची गर्दी उसळली होती, यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते.




