स्मशानभभमीत लाईटचीही व्यवस्था नाही; जेसीबी व स्वर्ग रथाच्या उजेडात अंत्यविधी उरकण्याची वेळ
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सेलु: दोन चिमुकल्या बहिणींचे मृतदेह एकाच तिरडीवर पाहुन संपुर्ण सेलु शहरासह परिसरातील नागरिक हळहळला. अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता-काळाने असा घाला कुणावरही घालु नये!
दोन्ही चिमुकल्या बहिणींचे मृतदेह जमिनीत पुरण्यात आले. मात्र, या हृदयद्रावक प्रसंगातही सेलु शहरातील मुलभुत सुविधांचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला. सेलु शहराला थ्री स्टार मानांकन मिळाल्याचा गाजावाजा पोस्टरच्या माध्यमातुन केला जात असताना, दुसरीकडे स्मशानभुमीत अंत्यविधीसाठी आवश्यक प्रकाशव्यवस्थाही उपलब्ध नसल्याचे चित्र दिसुन आले.
रात्रीच्या अंधारात दोन्ही बहिणींचा अंत्यविधी करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली. स्मशानभुमीत लाईटची व्यवस्था नसल्याने अखेर जेसीबीच्या दिव्यांच्या उजेडात अंत्यविधी उरकण्यात आला. या दृश्याने उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, कुटुंबातील मोठी बहीण गणपतीच्या जेवणासाठी मैत्रिणीकडे गेल्याने बचावली. मात्र, दोन चिमुकल्या बहिणींना एकाच तिरडीवरून अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे काळीज हेलावुन गेले.
एका बाजुला शहराच्या मानांकनाचा आणि विकासाचा गाजावाजा, तर दुसऱ्या बाजुला मृतांच्या अंत्यविधीसाठीही पुरेशा प्रकाशाची सुविधा नाही—या विरोधाभासाची चर्चा सध्या सेलु शहरात होत आहे.



