मशीनद्वारे तपासणी; महिला, पुरुष, बालकांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
शिवशाही न्युज नेटवर्क
हिंगणघाट
हिंगणघाट : छत्रपती शिवाजी पार्क येथे वेलनेस सेंटरच्या माध्यमातुन मशीनद्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरामध्ये महिला, पुरुष, मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आरोग्य तपासणी करून घेतली. यावेळी आरोग्य सल्लागार सुवर्णा मुडे, शीतल पंचभाई(फटींग) व ज्योती ढगे यांनी उपस्थितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व तसेच आरोग्याची काळजी घेण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.
शिबिराच्या आयोजनासाठी विद्या गिरी, संगीता लांजेवार, अनिता धाईत व जीवन उरकुडे यांनी परिश्रम घेतले. नागरिकांसाठी उपयुक्त ठरलेल्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उपस्थितांकडुन कौतुक करण्यात आले.

