१३ जण गंभीर जखमी; सोमनाथे लेआउटवर शोककळा
राजेश वरटकर
मुख्य संपादक
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा : सोमनाथे लेआउट, रामनगर येथील देवीची मूर्ती शेगाव (बुलढाणा) येथून वर्ध्यात आणण्यात येत होती. आज कारला चौकातुन वाजतगाजत देवीची मिरवणुक काढुन मुर्ती मंडपात नेण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच झालेल्या भीषण अपघाताने उत्सवावर दुःखाचे सावट पसरले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यु झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातातील मृतांमध्ये दत्ता खुरसंगे (५३), प्रवीण बकाने (५०), घनश्याम पाटील (६०), गोलू उर्फ सचिन बदलमवार (३८) आणि ओम गावंडे (२२) यांचा समावेश आहे. हे सर्व सोमनाथे लेआउट, रामनगर, वर्धा येथील रहिवासी आहेत.
अपघातात सागर ढोले (२५), राहुल मेहेकर, रोशन राऊत (२६), नयन गोदाके (३०), पवन ढोले, मुणेश्वर ढोले (५३), अमित ठाकरे, सतीश कुडे (३५), नंदू शिरसकर, दिनेश पवनकर, यश मलकापूर (३०), सतीश राऊत आणि नरेंद्र सोयाम (४९) हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर सावंगी तसेच पुलगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
देवीच्या आगमनाच्या आनंदासाठी सज्ज झालेल्या सोमनाथे लेआउटवर या दुर्घटनेने संपुर्ण वर्धा शहरात शोककळा पसरली असुन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




