जिवलग मित्र मंडळ घोराड यांनी स्थापन केलेली गणपती ची आकर्षक मुर्ती
“घोराड चा राजा”
श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसरात होते स्थापना
सात फुटी गणरायाची वाजतगाजत मिरवणुकीत स्थापना; भजन, समाजप्रबोधनासह महाप्रसादाचे आयोजन
घोराड : विदर्भातील दुसरे पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या श्री क्षेत्र घोराड येथील श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरात जिवलग मित्र मंडळाच्या ‘घोराडचा राजा’ गणरायाची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. मागील पाच वर्षांपासुन मंडळाकडुन गणेशोत्सवाची परंपरा जपली जात आहे.घोराड गावातील मुख्य चौकात तसेच श्री संत केजाजी महाराज मंदिर परिसरात स्थापना होत असल्याने या गणपतीला मानाचा गणपती म्हणुन मान्यता आहे.संपुर्ण गावातील तरुण वर्ग या मंडळाला सहकार्य लाभत असल्याने च या गणपतीला “घोराडचा राजा”संबोधले जाते.
मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी हेटी आमगाव येथुन आणण्यात आलेल्या सुमारे सात फुट उंच गणेशमुर्तीची वाजतगाजत भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पुजन करून गणरायाची स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजनसंध्या तसेच विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
७ ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन, तर ८ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायं पाच वाजता भव्य विसर्जन मिरवणुक काढण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत विविध आकर्षक देखावे आणि फटाक्यांची आतिषबाजी लक्षवेधी ठरणार आहे.दरवर्षी ही विसर्जन मिरवणुक बघण्यासाठी परिसरातील नागरिक हजेरी लावतात.
अध्यक्ष सार्थक फटिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल मेंढे, वैभव माहुरे, संकेत माहुरे, मयुर माहुरे, रुषल वरटकर, अमोल तडस, अमोल महाकाळकर, ओम तडस, यश धोंगडे, चिकु पोहाणे, हिमांशू महाजन, विशाल महाजन, ओम तळवेकर, चेतन राऊत यांच्यासह मंडळाचे सदस्य गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

