पुलगावात बैठक संपन्न
जयवंत मिश्रा यांची वर्धा जिल्हा मीडिया प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती; पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक मार्गदर्शन
राजेश वरटकर
मुख्य संपादक
वर्धा
पुलगाव : राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या वतीने सिंहगड,पुणे येथे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्धापन दिन व राष्ट्रीय अधिवेशनाच्या पुर्वतयारीसाठी पुलगाव येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक उत्साहात पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे व राष्ट्रीय कोषाध्यक्ष मारोती बडगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत येत्या ३० व ३१ आक्टोबर ला सिंहगड पुणे येथील रिसोर्ट मध्ये होणाऱ्या अधिवेशनाच्या नियोजनासह संघटनेच्या आगामी कार्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पत्रकार जयवंत मिश्रा यांची वर्धा जिल्हा मीडिया प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना संघटनेच्या कार्याची प्रभावीपणे माहिती प्रसारित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेकांनी आपले सदस्यत्व स्वीकारले.
बैठकीचे आयोजन वर्धा जिल्हाध्यक्ष प्रताप घांगळे आणि महिला अध्यक्षा वहिदा शेख यांच्या पुढाकाराने करण्यात आले. बैठकीला महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सचिन वासेकर, महेश देवशोध, हिरालाल रामटेके, अॅड. रेहाणा शेख, किरण नगराळे, लीना पाटील, ज्योत्स्ना नंदेश्वर,मंदा पाटील, जया प्रताप घांगळे, वैशाली राजन, ज्योती मुन, सपना तिडके, संगीता लोहकरे, प्रीती झाडे, अंजली राज, सीमा गुळभेले, अक्षय पाटील, प्रतीक नगराळे, अपर्णा देवतळे, मनिषा कांबळे, ज्योत्स्ना नंदेरे, विकास ठाकरे, गुलाबराव कावळे, मुन सर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“मानवाधिकारांचे संरक्षण हीच खरी लोकशाहीची ताकद!” या संदेशातुन संघटनेच्या आगामी कार्याची दिशा अधोरेखित करण्यात आली.

