रुपेश महाकाळकर
सेलु प्रतिनिधी
सेलु: शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान तवेरा वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वार्ड क्रमांक ४ मधील मच्छी विक्रेते दिवाकर मांढरे हे त्यांच्या MH-32-AG-4037 क्रमांकाच्या दुचाकीने विकास चौक मार्गे शेताकडे जात होते. यावेळी हिंगणीकडुन सेलुकडे भरधाव येणाऱ्या MH-35-M-0747 क्रमांकाच्या तवेरा वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दिवाकर मांढरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले.



