विशेष प्रतिनिधी
घोराड : वार्ड क्रमांक १ मधील न्यु बाल गणेश मंडळाने यंदाही गणेशोत्सवाची ४८ वर्षांची परंपरा कायम ठेवत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष अर्जुन पवार यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवातील कार्यक्रम उत्साहात पार पडत असुन परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या ४८ वर्षांपासुन मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा केला जात असुन धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांनाही विशेष महत्त्व दिले जाते. नागरिक व भाविकांचा कार्यक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
आज महाप्रसाद व गणरायाची विसर्जन मिरवणुक आयोजित करण्यात आली आहे.

