पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर उलगडले धक्कादायक सत्य
ग्वाल्हेरमध्ये खळबळजनक प्रकार; पत्नी बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेजमधुन समोर आला घटनाक्रम
शिवशाही न्युज नेटवर्क
ग्वाल्हेर : पतीसोबत प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी गेलेली नववधु काही क्षणांतच अचानक गायब झाली. पत्नी दिसत नसल्याने पतीची घाबरगुंडी उडाली. पत्नी हरवल्याच्या समजुतीने त्याने थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि समोर आलेला घटनाक्रम पाहुन पतीलाही धक्का बसला. पत्नी हरवली नव्हती, तर ती कथित प्रियकरासोबत दुचाकीवरून निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसल्याचा दावा केला जात आहे.
पती परत आल्यानंतर पत्नी दिसत नसल्याने त्याने तिचा शोध सुरू केला. मात्र, ती कुठेच न सापडल्याने त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
सीसीटीव्हीने उलगडले गुढ!
महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ती दुचाकीवरून अन्य व्यक्तीसोबत जात असल्याचे फुटेजमध्ये दिसल्याचे वृत्त आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला. लग्नानंतर लगेचच घडलेल्या या प्रकाराची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली असुन, संबंधित व्हिडिओही व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांचा अधिकृत खुलासा आणि पुढील तपासाची माहिती उपलब्ध नसल्याने सोशल मीडियावरील दाव्यांची स्वतंत्र पुष्टी होणे आवश्यक आहे.
शिवशाही न्युज | सत्याची निर्भीड बाजु

