शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांच्या वतीने आयोजित शालेय विभागीय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत दीपचंद चौधरी विद्यालय, सेलुच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत यश संपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी, कठोर मेहनत, नियमित सराव आणि सांघिक भावनेच्या जोरावर मिळविलेले हे यश विद्यालयासह संपुर्ण सेलु तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
१४ वर्षांखालील मुलींचा विजयी संघ
पूर्वी राऊत
रिया सावरकर
कोमल माहुरे
चैताली क्षीरसागर
१७ वर्षांखालील मुलींचा विजयी संघ
आराध्या सोमनाथे
श्रावणी कोथळे
भार्गवी मेघे
१९ वर्षांखालील मुलींचा संघ
दिव्या माहुरे
तनवी कोथळे
स्वराली पिहूल
भूमिका भावरकर
योगेश्वरी नोकरकर
या यशामागे खेळाडुंची मेहनत आणि जिद्द यासोबतच प्रशिक्षकांचे सातत्यपुर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. श्री. संजय बारी आणि क्रीडा शिक्षक श्री. सागर राऊत यांच्या परिश्रमांचे विशेष कौतुक करण्यात आले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. कल्पना मकरंदे, उपमुख्याध्यापक श्री. गोपाल खंडागळे, पर्यवेक्षक श्री. हरिहर मुडे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन केले.
क्रीडा विभाग व संघटनांकडुन अभिनंदन
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी श्री. संदीप खोब्रागडे, क्रीडा अधिकारी श्री. अनिल निमगडे, श्री. गणेश येल्लावार, क्रीडा मार्गदर्शक श्री. जमीर आत्तर, श्रीमती संजली वानखेडे आणि व्यवस्थापक श्री. रवींद्र काकडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
रग्बी संघटनेचे सचिव श्री. गौरव चैनानी यांनीही खेळाडुंचे कौतुक केले. तसेच सॉफ्ट टेनिस संघटनेचे सचिव श्री. अनंत भाकरे आणि श्री. दिलीप गावंडे यांनी खेळाडुंना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडु सज्ज!
दीपचंद चौधरी विद्यालयाच्या या यशामुळे सेलु तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे आणि सेलु तालुक्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडु सज्ज झाले आहेत.
💐 सर्व यशस्वी खेळाडु, मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यालय परिवाराचे हार्दिक अभिनंदन व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिवशाही न्युज परीवार तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा! 💐
