शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा : दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर शिवशाही न्युज नेटवर्कच्या सेवाग्राम रोड,वर्धा येथील कार्यालयाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कोराडी येथील चिमुकली पार्वती उर्फ सानवी जुमडे आणि आर्वी येथील चिमुकली दुर्गा दुर्योधन झाडे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या शुभप्रसंगी शिवशाही न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक राजेश वरटकर, कार्यकारी संपादक पी. पाटील, तसेच विनायक जुमडे, राजेश पारसमल, नीरज जुमडे, संदिप सलामे, प्रशांत बानकर (चिमुर), नरेश शेंडे, संदिप टिपले, महेश झाडे, भुमिका झाडे, सोनु शेळके, पियुश निस्ताने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा देत शिवशाही न्युज नेटवर्कच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थितांनी शिवशाही न्यूज नेटवर्कने निष्पक्ष, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातुन समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा दिल्या.
दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर सुरू झालेल्या या नव्या कार्यालयातून वर्धा जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळणार असून, पत्रकारितेच्या क्षेत्रात शिवशाही न्युज नेटवर्कची वाटचाल अधिक व्यापक होणार आहे.



