कथित खोट्या गुन्ह्यांमुळे त्रस्त असल्याचा मंगेश चोरे यांचा आरोप; सेलुच्या ठाणेदार यांना निलंबित करण्याची मुख्य मागणी
शिवशाही न्युज नेटवर्क
वर्धा
सेलू पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडुन करण्यात आलेल्या कथित अन्यायकारक कारवाईमुळे आपण मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळलो असुन, या ठिकाणी न्याय मेल्या शिवाय मिळत नाही याची खात्री झाल्याने आपण येत्या ३१ ऑक्टोबर रोजी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा स्पष्ट इशारा मंगेश चोरे यांनी दिला आहे.तसे निवेदन सर्व संबंधितांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, सेलु येथील संबंधित ठाणेदाराला निलंबित करून याची सखोल चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
केळझर परिसरातील कथित अवैध धंद्यांविरोधात बातम्या प्रकाशित केल्यानंतर आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप मंगेश चोरे यांनी केला आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचेही त्यांनी सांगितले.या ठाणेदारांच्या अनेक बेकायदेशीर विषयाचे पुरावे आपल्याकडे असल्याने त्यांनी अनेक धमकीचे फोन सुद्धा केलेत.मात्र याना प्रतिसाद न दिल्याने यांनी आपल्याला बुद्धीचा उपयोग करून ताब्यात घेतले
ताब्यात घेऊन रस्त्यात एका पी एस आय च्या सहकाऱ्याने आपल्या पोटावर मारहाण केल्याचा स्पष्ट आरोप पत्रकार चोरे यांनी केला आहे.त्यामुळे आमच्यावर मृत्युची वेळ आली होती.त्यामुळे उपचारासाठी मुंबईला जावे लागले . आम्ही घरात नसतांना सदर ठाणेदार यांनी कोणताही सर्च वारंट नसतांना घरी येऊन संदर्भातील पुरावे कंप्युटर मधे असेल यामुळे आणि कोणताही सर्च वारंट नसतांना येकटी बाई घरात असतांना घरातील संगणक आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढून नेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या सर्व आरोपांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी मागणी करण्यात आली आहे.रस्त्यात एका पी एस आय सोबत आपल्याला मारहाण करताना बघणाऱ्या साक्षदरचे बयान नोंद करावे.तसेच डी व्ही आर आणि कम्युटर घरातुन नेतांना पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने बघितलेला प्रकार आणि घरापुढे मंदिरात भजन करीत असलेल्या महिलांचे बयान नोंद करून ठाणेदार सेलु त्याचेवर कारवाई करावी अशी मागणी आहे.
ज्या ज्या वेळी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार उघड केले.त्यांच्या बातम्या प्रकाशित केल्या त्या त्या वेळी.आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले.मागील तीन वर्षा पूर्वी एका आठवड्यात अनेक खोटे गुन्हे दाखल करून भ्रष्ट पोलिसांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरफायदा घेतला.परंतू आपण साविधानिक मार्गाने सहन केले.परंतु आता आपली सहनशीलता संपली असुन.आपण ही टोकाची भुमिका घेत आहे.असेही त्यांनी वेक्त केले असुन आपल्या मरण्याला सेलुचे ठाणेदार हे सर्वस्वी जबाबदार समजले जावे असेही नमुद करण्यात आले आहे.
३१ ऑक्टोबरपूर्वी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित तक्रारींची चौकशी करावी, दाखल गुन्ह्यांबाबत कायद्यानुसार निर्णय घ्यावा आणि आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार चोरे यांनी केली आहे.आपण आजपर्यंत झालेला सर्व बेकायदेशीर प्रकार पुरावे देऊन.पोलीस महासंचालक तसेच मानवाधीकार आयोग आणि पोलीस प्राधिकरण विभागाला दिला असल्याचे सांगण्यात येते. आज दिनांक 21/10/2026 ला प्रत्यक्ष भेट घेऊन पोलीस महानिरिक्षक नागपुर यांची भेट घेऊन सदरचे लेखी निवेदन सादर केले.
पत्रकारितेच्या माध्यमातुन गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणाऱ्या व्यक्तीला न्यायासाठी इतक्या टोकाची भूमिका घेण्याची वेळ येणे ही चिंतेची बाब आहे. प्रशासनाने तातडीने संवाद साधुन परिस्थिती निवळवावी आणि कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपण दिनांक ३० पर्यंत अंगात तिरंगा वस्त्र परिधान करून जिवलगांच्या भेटी घेणार असुन.आज पर्यंतच्या जिवन प्रवासात आपल्याकडून कळत न कळत कुणाचे मन दुखावले असेल त्यांनी आपल्याला माफ करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
