२७ तारखेला निकालानंतर चित्र होणार स्पष्ट; अनेक गावांत कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने संभ्रम
शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु
नागपुर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडत आहे. मात्र, मतदारांचा नेमका कौल कोणाच्या बाजुने आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे २७ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीत सुज्ञ आणि जागरूक मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला; मात्र अनेक ठिकाणी विविध पक्षांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत अपेक्षेप्रमाणे पोहोचु शकले नाहीत. अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांची अनुपस्थिती जाणवल्याने काही मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, पारंपरिक राजकीय समीकरणांपेक्षा पदवीधर मतदारांनी आपल्या पसंतीनुसार मतदान केल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निकालाचा अंदाज बांधणे राजकीय पक्षांसाठीही कठीण झाले आहे.
दरम्यान, ‘शिवशाही न्युज’चे मुख्य संपादक राजेश वरटकर यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
आता सर्वांचे लक्ष २७ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला, हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
