मेंदुतील रक्तस्रावामुळे सावंगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु; बुधवारी होणार अंत्यसंस्कार
शिवशाही न्युज नेटवर्क
घोराड : सेलु तालुक्यातील घोराड येथील रहिवासी दशरथ कुशाबराव खराबे (वय ४८) यांचे मेंदुतील रक्तस्रावामुळे सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने घोराड परिसरात शोककळा पसरली आहे.
दशरथ खराबे यांचीआठ दिवसांपुर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी घोराड येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार असुन, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शिवशाही न्युज नेटवर्क परिवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली!
