शिवशाही न्युज नेटवर्क
सेलु:
वृत्तपत्र क्षेत्रात नव्याने पदार्पण करणाऱ्या शिवशाही न्यूज लाइव्ह नेटवर्कचा श्री क्षेत्र घोराड येथील बोरतिर्थावरील श्री पुंडलिक महादेव मंदिर परिसरात श्री सत्यदेव महादेव जयंती व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर दि.१ एप्रिल बुधवारला प्रदोष काळात आभासी (Online)पद्धतीने वृत्तपत्राचे लोकार्पण करीत उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
श्री संत केजाजी महाराजांचे पारिवारिक सदस्य श्री रामाजी भांदककर यांनी श्री महादेव मंदिरात शिवपुजा करीत मोबाईलवरील लिंकवर क्लिक करून शिवशाही न्यूज लाइव्ह पोर्टलचे उद्घाटन तसेच आँनलाईन वृत्तपतत्राचे लोकार्पण केले.
या सोहळ्याच्या उद्घाटक म्हणून ह.भ.प. अंकिता ताई खांडगे (बीड), सुप्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार, यांनी आभासी माध्यमातून उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री महेश भाऊ ठाकुर (अध्यक्ष, गर्जना सामाजिक संघटना, वर्धा), श्री गजानन अजबले (प्रसिद्ध उद्योजक, मुंबई), श्री विकास कांबळे (अध्यक्ष, नागरी निवारा परिषद, मुंबई), श्री रवींद्र कोटंबकार (मुख्य संपादक, दैनिक साहसिक, वर्धा), श्री सचिन मेश्राम (मुख्य संपादक, अखंड न्याय दर्पण, चंद्रपूर), श्री प्रविण काळे (ठाणेदार, कळमणा, नागपूर), API दीपक वानखेडे (पोलीस स्टेशन, हिंगणघाट), श्री देवेंद्र ठाकुर (ठाणेदार, सेलू), गोपाल बिसणे (माजी ठाणेदार, यवतमाळ), श्री प्रल्हाद काटकर (माजी ठाणेदार, वाशिम) तसेच श्री दीपक वासे (बिल्डर डेव्हलपर्स, नागपूर) श्री रुद्र चोपडे EBP प्रधानमंत्री दिव्यशा केंद्र नागपुर, श्री किशन सिंह राजावत मोदी (राजस्थान), श्री शैलेंद्र यादव उज्जैन (मध्यप्रदेश) तसेच लोकमत तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल लुंगे यांनी आभासी पद्धतीने (Online) हजेरी लाऊन शुभारंभ केला तसेच शिवशाही न्युज लाइव्ह पोर्टल च्या संपुर्ण टिम ला शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांनी शिवशाही न्युज लाईव्ह च्या वाटचालीस शुभेच्छा देत, डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत जलद, अचुक आणि निष्पक्ष बातम्या पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मुख्य संपादक राजेश वरटकर, कार्यकारी संपादक माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश खोपडे,राजेन्द्र माहुरे, सचिन पोहाणे, अनुज वरटकर,निलेश तडस,रुषल वरटकर, मुकेश वाघमारे यांच्येसह नागरिकांची उपस्थिती होती.

