वर्धा तालुक्यातील रोठा येथे १२ वर्षीय चिमुकली वर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेने संपुर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, पोलिसांनी एका संशयिताला राहुल राजु मडावी (३०वर्ष) याला रोठा परिसरातुन अटक केली आहे.
मृत तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला होता. तेव्हा रुग्णालय परिसरात शेकडो नागरिक जमा झाले. संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणात राहुल राजू मडावी (वय ३०, रा. रोठा) याला पोलिसांनी अटक केली आहे. तपासाची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहा सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या घटनेमुळे संपुर्ण वर्धा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असुन, आरोपीला जलदगतीने न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करून कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांतुन होत आहे.पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन संशयीत आरोपी ला अटक केल्याची माहिती दिली असुन अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असुन वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच या गंभीर गुन्ह्याचा तपास पुर्ण होणार असुन आरोपीला आज दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.तसेच या गंभीर गुन्ह्यात आणखी दोन आरोपी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे,तथापी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.विवीध सामाजिक संघटना चे वतीने आरोपींना कडक शिक्षा करावी व मृतक चिमुकली च्या परिवाराला न्याय मिळावा यासाठी उद्या वर्धा बंद चा नारा देण्यात आला आहे.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिक तसेच विविध संघटनांनी जोरदार मागणी केली आहे.

