विशेष प्रतिनिधी
सिंदी (रेल्वे)
सिंदी (रेल्वे) येथील उपनगराध्यक्ष अकीलभाई शेख हे सोमवारी सायंकाळी सोनेगाव परिसरात झालेल्या अपघातात जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असुन नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अकीलभाई शेख हे आपल्या वाहनाने जात असताना अचानक अपघात झाला. अपघाताची तिव्रता लक्षात घेता वाहनाचे नुकसान झाले असुन उपनगराध्यक्ष अकील शेख यांना दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली.मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने
पुढील उपचारासाठी नागपुर येथील न्युरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असुन, तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी, नागरिक व समर्थकांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेतली. अनेकांनी त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.
दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसुन, संबंधित यंत्रणेकडुन तपास सुरू करण्यात आला आहे. रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग अथवा अन्य कारणांमुळे अपघात झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

