
पुलगांव/ प्रतिनिधी
पुलगाव ते वर्धा हा महत्त्वाचा जीवनदायी मार्ग…
पण आज तो मार्ग नाही, तर खड्ड्यांचा सापळा बनला आहे!
“Mercedes-Benz आणि Toyota Fortuner मध्ये बसुन हा रस्ता कदाचित ‘ठीक’ वाटत असेल…
पण सामान्य माणसासाठी?
प्रत्येक खड्डा म्हणजे रोजचा प्रश्न, रोजची परीक्षा!
शेतकरी असो, विद्यार्थी असो किंवा कामगार—
या रस्त्यावरून प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणं नाही…
तर धैर्य, संयम आणि नशिबाचा खेळ!
एक खड्डा चुकवला की दुसरा तयारच…
गाडी सांभाळली तर शरीराला फटका…
आणि दुचाकीवाल्यांसाठी तर हा रस्ता म्हणजे
“दररोजचा जिवावर बेतणारा जुगार!”
लोकप्रतिनिधींवर विश्वास आहे, त्यांच्या कामाची जाणीवही आहे…
पण प्रश्न एकच —
हा रस्ता त्यांनी स्वतः अनुभवला आहे का?
कारण मोठ्या, मजबुत गाड्यांमधुन जाताना
हे खड्डे फक्त “लहान अडथळे” वाटतात…
पण सामान्य माणुस?
तो प्रत्येक खड्ड्यात स्वतःचा तोल सावरतो…
आणि प्रत्येक दिवस विचारतो —
“आज निभावलं… उद्या काय?”
हा विषय फक्त रस्त्याचा नाही…
हा जनतेच्या वेदनेचा, भीतीचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे!
पण
नागरिकांची नम्र पण ठाम मागणी
एकदा या रस्त्यावरून साध्या वाहनाने प्रवास करा…
खड्डेच खरी परिस्थिती सांगतील!
ही टीका नाही…
हा वास्तव अनुभव आहे!
वेळेत लक्ष दिलं तर रस्ता सुधरेल…
नाहीतर —
जनतेचा विश्वासच खड्ड्यात जाईल!

