मेहनतीच्या बळावर साक्षीची नागपुर पोलिस दलात निवड
राजेश वरटकर
मुख्य संपादक
सिंदी रेल्वे : परिस्थिती जीवनाची उत्तम मार्गदर्शक असते. हेच साक्षीने खरे करुन दाखविले….!
घरची परिस्थिती अत्यंत बेताची,आई शेतमजुर तर वडील खेड्यापाड्यात जाऊन पीगर विक्री आणि भंगार व्यवसाय करुन तीन मुली मिळुन पाच लोकांच्या कुटुंबाचा गाडा घालवितात.
मात्र सर्वात लहान साक्षीने या परिस्थीतीशी दोन हात करण्याची मनाशी बांधलेली गाठ आणि घेतलेल्या कडक परिश्रमाच्या जोरावर पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरविले.
साक्षी कल्पना रोहीदास वर्जे हिचे नागपुर पोलिस विभागात निवड झाल्याने साक्षीवर सर्वच स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तीच्या या यशाबद्दल तीच्या घरी जाऊन साक्षीला शाल श्रीफळ आणि पेढे भरवुन हृदय स्पर्शी सत्कार करण्यात आला.
नगरपालिकेच्या महिला बालकल्याण उपसभापती वर्षा सुनील बोंबले, नगरसेवक आशिष देवतळे, अमोल सोनटक्के, प्रशांत कलोडे, आनंद छाजेड ,गौरव कलोडे, धनराज झिलपे ,अमित सातपुते, धर्मेंद्र झाडे, मिलिंद पेटकर, खुशाल बोरकर, संजय तडस, बालु इंगोले, श्रीकांत घोडमारे, चंपू भन्साली, सुनील बोंबले, विनायक सोनटक्के, किशोर सोनटक्के, संदीप आगलावे उपस्थित होते.

