रावेरी (ता. राळेगाव) :
संघर्षातुन उभ्या राहिलेल्या महिलांच्या कर्तृत्वाला आज देशातील एकमेव सिता माता मंदिर असलेल्या रावेरीत अभिमानाचा सलाम ठोकण्यात आला! स्त्री शक्ती मातृत्व व संघर्षाचे प्रतिक असलेले मंदिर म्हणुन ओळखले जाणारे देशातील एकमेव सिता माता मंदिर असुन येथे मागील पंचवीस वर्षांपासुन सितानवमी उत्सव साजरा केला जातो. आज सिता नवमी उत्सव व स्वयं-सिद्धा सीता गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत महिला सक्षमीकरणाचा जोरदार नारा घुमला.
समाजाच्या कडेलोटावर ढकलल्या गेलेल्या परिस्थितीतुन स्वतःचा मार्ग तयार करणाऱ्या जिद्दी महिलांचा सन्मान होताच उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला. “आता महिला केवळ घरापुरत्या नाहीत, तर समाजाच्या केंद्रस्थानी उभ्या आहेत,” असा ठाम संदेश या सोहळ्यातुन देण्यात आला.यावेळी
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
माजी आमदार वामनराव चटप
माजी आमदार सरोजताई काशीकर
मा. सरिताताई कौशीक (कार्यकारी संपादक, एबीपी माझा) – विशेष अतिथी
तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विधवा तसेच घटस्फोटीत महीलांनी समाज व परिस्थितीशी दोन हात करुन तसेच आलेल्या संकटांना हरवुन उभ्या राहिलेल्या या महिलांनी अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
महिला सक्षमीकरणाचा बुलंद नारा!
“आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाशिवाय प्रगती नाही,” असा ठाम संदेश देत मान्यवरांनी महिलांनी पुढे येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
रावेरीत आज फक्त सिता नवमी उत्सव नव्हता… तर महिलांच्या सामर्थ्याचा जागर होता!

