* जिल्हाधिकारी वान्मथी सी. व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिले निवेदन.
* यशवंत झाडे यांनी केले शेतकऱ्याला यथोचित मार्गदर्शन.
राजेश वरटकर
मुख्य संपादक
संपूर्ण वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन सर्व प्रकारचे पिके नष्ट झाली. काही ठिकाणी पिके करपुन गेली तर काही ठिकाणी शेत जमीनीची माती खरडुन वाहुन गेली असुन काही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पिके नष्ट झाल्याने आता वर्षभर कुटुंबाला जगवायचे कसे? हाच प्रश्न वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. या विवंचनेत शेतकरी असतांना अश्यातच वर्धा तालुक्यातील सावली (सास्ताबाद) येथील पंकज मंगलराल पिसुड्डे नामक एका नैराश्यग्रस्त शेतकऱ्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना गांजा लागवड करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी निवेदनातुन मागणी केल्याची माहिती पसरताच संपुर्ण वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी पंकज पिसुड्डे यांच्याकडे मौजा नुरापुर शिवारात शेत सर्वे क्र. ११/२ आराजी १.४६, हे.आर. वडिलोपार्जित शेती असुन यंदा च्या वर्षी त्यांनी शेतात कापूस व सोयाबीन या पिकांची लागवड केली होती. सतत आलेल्या परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी होऊन त्यांची पिके पुर्णतः नष्ट झाली असुन थोड्या फार प्रमाणात शिल्लक पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
विशेष करुन त्यांच्यावर तरोडा येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेचे सन २०१९ पासुन चे १ लाख ८४ हजार कर्ज सुध्दा थकित आहे. शेती साठी लागत असलेले बी. बियाणे, खते, कीडनाशके औषधी फवारणी, शेत मजुरांची मजुरी यात प्रचंड वाढ झाली. खर्च भागविण्यासाठी खाजगी कर्जाऊ रक्कम अंगावर थकलेली असल्याने आणि नापिकी व अतिवृष्टीमुळे हातात आलेले पिके नष्ट झाल्याने आता वर्षभर कुटुंबाला जगवायचे कसे? हाच प्रश्न भेडसावत असल्याने त्रस्त होऊन पंकज पिसुड्डे या नैराश्यग्रस्त शेतकऱ्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना गांजा लागवड करण्याची परवानगी द्यावी अशी लेखी निवेदनातुन मागणी केली.
तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांची कार्यालयात जाऊन त्यांच्या कडे आपली व्यथा मांडली. यशवंत झाडे यांनीही पंकज पिसुड्डे यांचे मानसिक मनोबल खचु न देता अ.भा. किसान सभेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन कर्जमाफी सह नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे शेतकरी पंकज पिसुड्ढे सांगितले. आहे. यावेळी शेतकरी पंकज पिसुड्डे यांचे किसान सभेच्या वतीने समुपदेशन करुन आत्महत्या करणे, शेतात गांजा ची लागवड करणे हा पर्याय योग्य नसल्याचा योग्य सल्ला दिला. यावेळी किसान सभेच्या कार्यालयात यशवंत झाडे, भिमराव नाखले, संजय भगत, शिलानंद बुरबुरे उपस्थित होते.

