वैभव ढोबळे/प्रतिनिधी
सिंदी (रेल्वे) :परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असुन नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील काही दिवसांपासुन नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसुन तब्बल ४ ते ५ दिवसांतुन एकदाच पाणी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, तसेच स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना पाणी साठवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असुन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडुन करण्यात येत आहे.

