वैभव ढोबळे/प्रतिनिधी
सिंदी (रेल्वे); येथील सार्वजनिक हनुमान मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासुनच मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात विशेष पुजाअर्चा, अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर भजन, कीर्तन तसेच धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. अनेक भक्तांनी हनुमान चालिसाचे पठण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.
उत्सवानिमित्त महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर आकर्षक रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता.
- या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व स्थानिक युवकांनी विशेष परिश्रम घेतले. एकंदरीतच सिंदी (रेल्वे) परिसरात हनुमान जयंतीचा उत्सव आनंददायी व भक्तिमय वातावरणात पार पडला.


